About

अध्यक्षांचे मनोगत

  • विश्वास मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट, औरंगाबादः अध्यक्ष

सन्मानीय पालक बंधू भगिनी शैक्षणिक वर्ष २०१६ - १७ हे वर्ष संस्कार ग्रुप चे दशकपूर्ती झाले. गेल्या १२ वर्षात पालकांच्या बहुमूल्य सहकार्य, त्यांचा आमच्यावरच विश्वास व आमच्या सर्व मुख्याधापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मेहनतीच्या बळावर आम्ही आपल्या परिसरात शैक्षणिक क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव कमावले आहे.

गेल्या १२ वर्षांपूर्वी या प्रशालेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे संस्कारक्षम ,शिस्तप्रिय गुणवत्ताधारक व सर्व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व घडवण्याचे ध्येय समोर ठेऊन आम्ही या शाळेचा पाय रचला. पहिल्या वर्षी फक्त ६५ विद्यार्थ्यांपासून शाळेची सुरवात करताना आज २८०० विद्यार्थी व २०० कर्मचारी असा हा संस्कार ग्रुप निर्माण झाला आहे. प्रत्येक तुकडीत ३० विद्यार्थी व २ शिक्षक अशी रचना करून प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष कसे देता येईल, याची आम्ही काळजी घेत आहोत व घेतली आहे. प्रशालेत राबवले जाणारे विविध उपक्रम ,कार्यक्रम तसेच स्पर्धा परीक्षांतून आजच्या या स्पर्धात्मक युगात त्यांना कणखर बनविणे , त्यांच्या अंगी असणारे छुपे गुण शोधणे प्रत्येक स्पर्धेसाठी त्यांना तयार करून त्यांचा भविष्याचा मार्ग सुकर करण्यासाठी आमचा संस्कार ग्रुप प्रयत्न करत आहे,रोज झालेल्या अभ्यासक्रमावर वर्गपाठ ,गृहपाठ देणे ,दुसऱ्यादिवशी तो तपासणे त्यातून त्यांच्या चुका शोधून त्यांना मार्गदर्शन करणे , तसेच दर आठवड्याला ,महिन्याला झालेल्या अभ्यासक्रमावर त्यांच्या टेस्ट घेणे यातून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. गेल्या ०५ वर्षापसून इयत्ता १० वी. चा १०० टक्के निकाल तर सर्व परीक्षांमध्ये शाळेचे विद्यार्थी चमकणे हे शाळेच्या गुणवत्तेचेच दयोतक आहे.

श्री.जगदीश देसले - अध्यक्ष
विश्वास मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट, औरंगाबाद

मागील ०९ वर्षांपासून सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरूमद्वारे हायटेक शिक्षण आम्ही देत आहोत. इंग्रजी माध्यमाचे स्टेट व CBSE बोर्ड पॅटर्न देखील शाळेत सुरु करून इंग्लिश स्कूलचाही नावलौकिक वाढविला आहे.इयत्ता १ ली. पासून सेमी इंग्रजी माध्यम तसेच सर्व विद्यार्थ्यांचा अपघाती विमा,सर्वाना संगणकीय शिक्षण हि शाळेची अजून वेगळी वैशिष्ठे आहेत .शिक्षक आपल्या दारी,पालक मिटिंग व पालकांशी विद्यार्थ्यांचा गुणवत्तेसंदर्भात फोनद्वारे फीडबॅक,मोबाइल अँप्स व विद्यार्थी अनुपस्थिबाबत SMS सुविधा यातून आम्ही पालकांशी नियमित संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी आपण Sanskar School App Play store वरून डाउनलोड करू शकता.

आपल्या पाल्याला आमच्या प्रशालेत टाकण्याचा तुम्हाला पश्चताप न वाटता अभिमानच वाटला पाहिजे अशी शाळा यापुढेही निर्माण करण्यासाठी तसेच आपल्या पाल्यास संस्कारक्षम ,शिस्तप्रिय व गुणवत्ता धारक बनविण्यासाठी आम्ही व आमचा संस्कार ग्रुप कटिबद्ध आहे.पुनःश्च एकदा आमच्या सर्व पालकांचे गेल्या १२ वर्षातील बहुमूल्य सहकार्य व विश्वासाबद्दल शतशः धन्यवाद व यापुढेही आपले असेच सहकार्य मिळेल हि अपेक्षा....
धन्यवाद ...!